|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दुर्गामाता दौडीची आज सांगता

दुर्गामाता दौडीची आज सांगता 

प्रतिनिधी/ सांगली

शहरात सुरु असलेल्या दुर्गामाता दौडीच्या निमित्ताने शुक्रवारी नवव्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, काँग्रेस नेते विशाल पाटील व नगरसेवक शेखर माने यांची उपस्थिती होती. यानिमित्ताने शुक्रवारी पहाटे शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर धारकऱयांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. पाहुण्यांच्या हस्ते ध्वजपूजन होऊन दौडीस प्रारंभ करण्यात आला. दौडीचे ठिकठिकाणी मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले. दरम्यान, शनिवारी विजयादशमी दिवशी दौडीचा सांगता होणार असून यावेळी गडकोट मोहिमेच्या ठिकाणाची माहिती देण्यात येणार आहे.

शिवाजी पुतळय़ापासून निघालेली दौड मनपा रोड, राजवाडा चौक, रॉकेल लाईन, जैन मंदीर, आमराई रस्ता, कॉलेज कॉर्नरमार्गे दुर्गामाता मंदिराजवळ आली. त्यानंतर दुर्गामाता देवीची आरती करण्यात आली. यावेळी संभाजीराव भिडे गुरुजींनी शिवजन्मानंतरच्या ऐतिहासिक घटना सांगत मार्गदर्शन केले. गुरुजी म्हणाले, महाराणी जिजामातांनी आई भवानीच्या पायाशी वरदान मागितले. ते वरदान शिवबांच्या रुपाने जन्माला आले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या परंपरेची आपल्यावर कृपा आहे. त्या काळातील संतही विलक्षण होते. त्यांनी त्या काळात भगवंताचे काम पूर्ण केले. हिरण्यकश्यपू जसा प्रल्हादाला जाळण्याचा प्रयत्न करत होता, तशी आता देशाची स्थिती बनत आहे. संकटाच्या परिस्थितीत सर्वांच्या पाठीशी उभे राहावे व देशाला संकटात घालणाऱया रावणाचा वध करण्यासाठी रामाच्या रुपात जन्माला यावे असे आईकडे साकडे घालत आहे. दिल्लीवर भगवा फडकावण्याची जिजाऊंनी दिलेली हाक आईने पूर्ण केली. 50 वर्षांत मराठय़ांनी देश पादाक्रांत करत अटकेपार झेंडा फडकावला.

    दुर्गामाता मंदिरपासून निघालेली दौड कॉलेज कॉर्नर, आपटा पोलीस चौकी, माळी गल्ली, काँग्रेस भवन, आझाद चौक, आमराई, पटेल चौक, तानाजी चौक, बुरुड गल्ली, गजेंद्र मंडळ, सराफ कट्टा, कोटणीस वाडय़ापासून शिवतीर्थ येथे आली. परतीच्या मार्गावर धारकऱयांनी राष्ट्रप्रेमाची व देशप्रेमाचे महत्व सांगणारी गीते म्हटंली. नियोजित मार्गावर ठिकठिकाणी रांगोळी व फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. शिवतीर्थाजवळ गुरुजींच्या मार्गदर्शनानंतर नवव्या दिवशीच्या दौडीची सांगता करण्यात आली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी नितीन चौगुले, बापू हरिदास, आनंदा चव्हाण, नीलेश चौगुले, मोहनसिंग सिसोदिया, हरिहर तानवडे, आण्णासाहेब वडर, राजेंद शहापुरे आदींसह  युवक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. आज 30 सप्टेंबर रोजी दुर्गामाता दौडीची सांगता होणार आहे.

आजचा दौडीचा मार्ग

 जाताना : शिवतीर्थ, अग्निशमन दल, राजवाडा चौक, आझाद चौक, आमराई, कॉलेज कॉर्नर, दुर्गामाता मंदीर.

येताना : दुर्गामाता मंदिर, कॉलेज कॉर्नर, खणभाग, रविकिरण डेअरी, सत्यविजय चौक, लाळगे गल्ली, हिराबाग कॉर्नर, बापट बाल मंदिरसमोरुन सिटी हायस्कूल, विष्णू घाट ते शिवतीर्थ. 

 

Related posts: