|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सोमवारी माघारी परतलेल्या पर्यटकांचे पैसे मिळणार परत

सोमवारी माघारी परतलेल्या पर्यटकांचे पैसे मिळणार परत 

वार्ताहर / कास

कास पठारवरील फुलांचा हंगामा जोरात सुरू असुन  सोमवारी शासकीय सुट्टी असल्याने  हजारो पर्यटकांनी कास पठार पाहण्यासाठी ऑनलाईन बुंकीग केली होती मात्र सोमवारी सकाळी अचानक यवतेश्वर घाटात दरड कोसळल्याने यवतेश्वर मार्गे कास पठारकडे जाणारी  वाहतुक दिवसभर पुर्णपणे बंद केल्याने तिन हजारच्या वर ऑनलाईन बुकींग केलेल्या पर्यटकांना कास पठार पर्यंत पोहचता आले नाही त्यामुळे जे पर्यटक कास पठार पर्यंत पोहचले नाहीत अशा पर्यटकांचे पैसे परत देणेचा निर्णय कास कार्यकारी समीतीसह वनविभागाने  घेतला आहे

          सलग तिन दिवस व सोमवारी शासकीय सुट्टी असल्याने सोमवारी कास पठार पाहण्यासाठी तिन हजार पर्यटकांनी ऑनलाईन बुकींग केली होती त्यातील काही पर्यटक सकाळी घाटात दरड कोसळण्याच्या आगोदर पठार वर पोहोचले होते व काही पर्यटक कुंसुंबी  मेढा दुंद महाबळेश्वर बामणोली मार्गवरून बुकींग केलेले सारासरी चारशे ते पाचशे पर्यटक पोहोचले होते उर्वरीत दोन ते अडीच हजार पर्यटक निराश होवुन सातारमधुनच माघारी परतले होते त्यामुळे हंगामाच्या उर्वरीत काळात सोमवारी बुंकीग असलेल्या माघारी परतलेल्या पर्यटकांना त्याच बुकीगवर पठार पाहण्यास परत आल्यास प्रवेश दिला जाणार आहे व या हंगामा काळात ते पर्यटक पठार वर पुन्हा न त्यांना हंगामा संपल्यानंतर त्यांचे बुंकीग केलेली पैसे परत करण्याचा निर्णय कास कार्यकारी नियोजन समीतीसह वनविभागाने घेतला आहे

          सोमवारी दरड कोसळण्याच्या अगोदर व दिवसभर ऑनलाईन बुकीग करून व अन्य पर्यायी मार्गावरून कास पठारवर पाचशेच्या वर पर्यटक पोहचले होते त्यांची नोंद वनसमीतीने रजिस्टर मध्ये लिखीत केली आहे कास पठारचा फुलांचा हंगामा अंतिम टप्यात आला असुन हंगामाच्या उर्वरीत काळात ऑनलाईन बुकीग बंद करण्याचा निर्णयही वनसमीतीने घेतला असल्याची माहीती कास पठार कार्यकारी नियोजन वनसमीतीने दिली आहे.

Related posts: