|Saturday, March 28, 2020
You are here: Home » leadingnews » आरबीअयाचे पतधोरण जाहीर, व्याजदरात बदल नाही

आरबीअयाचे पतधोरण जाहीर, व्याजदरात बदल नाही 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चौथे द्विमासिक पतधोरण बुधवारी जाहीर केले असून व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आले नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये महागाईच्या दरात वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने व्याज दर स्थिर ठेवले आहेत.

गेल्या द्विमासिक पतधोरणात रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केली होती. मात्र यंदाच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर कायम ठेवले जाण्याची चर्चा आधीपासून होती. मंगळवारपासून पतधोरण समितीच्या बैठकीला सुरूवात झाली होती. बुधवारी ही बैठक संपल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले. अपेक्षेनुसार पतधोरण समितीने रेपो दर कायम ठेवले आहे. यानुसार रेपो दर 6 टक्क्यांनी तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्क्यांवर कायम आहे. विकासदर 6.7 टक्के इतका राहिल, असे अनुमान रिझर्व्ह बँकेने वर्तविले. यापूर्वी हाच अंदाजे 7.3 टक्के इतका वर्तवण्यात आला होता.

 

 

Related posts: