|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » दिवाळीपूर्वी फक्त सहा जिल्हय़ांनाच कर्जमाफी

दिवाळीपूर्वी फक्त सहा जिल्हय़ांनाच कर्जमाफी 

वार्ताहर/ सोलापूर

दिवाळीपूर्वी राज्यातील फक्त सहा जिल्हय़ांची कर्जमाफी करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून त्या सहा जिल्हय़ामध्ये सोलापूरचा समावेश असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे सोलापूर जिल्हय़ातील सव्वादोन लाख शेतकऱयांची दिवाळी गोड होणार आहे.

 विभागीय आयुक्त दळवी हे बुधवारी सोलापूर दौऱयावर आले असता पत्रकारांशी बोलत होते. स्मार्ट सिटीमध्ये 10 प्रकारची कामे व 48 प्रकारची उपकामे आहेत. पहिल्या टप्पात काही कामे होणार आहेत तर बाकीची कामे दुसऱया टप्प्यात होणार आहेत. यासाठी वर्कऑर्डर देऊन काम देण्याविषयीची आढावा बैठक घेण्यात आली. हे काम पूर्ण करण्यासाठी तिमाही टार्गेट द्यावे अशा सुचना स्मार्ट सिटीच्या बैठकीत देण्यात आल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत तहसिलदार, प्राताधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये झिरो पेन्डसी व अभिलेख वर्गीकरण याबाबतीत बार्शी, अक्कलकोट व करमाळा या तालुक्याचे काम अपूर्ण असल्याने त्या तात्काळ पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या. मतदार यादी पुर्नरिक्षण करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

उजनी धरणग्रस्तांचे 100 प्रस्ताव प्रलंबीत आहेत. व गावठाणमध्ये पुनर्वसन झालेल्यांना अजूनही काही सुविधा नसल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारींचे दोन महिन्यात निरसरण करून कारवाई करण्याच्या सुचना करण्यात आल्या.

जिल्हा परिषदेच्या अभिलेख वर्गीकरणाचे काम उत्कृष्ठ झाल्याचे सांगत कौतुक केले. व 1 डिसेंबरपूर्वी पेन्डसीचे काम अपूर्ण न ठेवण्याच्या सुचना केल्या. यानंतर कोणत्याही सामान्य व्यक्तीचे काम हे तालुकास्तरावरून 1 महिना, जिल्हापरिषद स्तरावरून दोन महिन्यापेक्षा जास्त वेळ न राहू देण्याच्या सुचना दिल्या. अभिलेख वर्गीकरणामुळे येत्या तीन महिन्यात लोकाची कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही व तात्काळ पूर्ण होणार आहेत.

     हजर न राहणाऱया उपजिल्हाधिकाऱयावर कारवाई होणार

जिल्हय़ातील उपजिल्हाधिकाऱयाची पोस्टींग झाली आहे. परंतु ते अजूनही हजर न झाले नाहीत. जर ते हजर झाले नाहीत तर विभागीय आयुक्त म्हणून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.

 

        जि.प. वर्ग 3 व 4 ची भरती इतक्यात नाही.

शासनाने जि.प. च्या वर्ग 3 व 4 च्या भरतीवर बंदी घातल्याने भरती निघणार नाही. सध्या फक्त अनुशेष भरती निघू शकते. परंतु ही भरती अल्प असल्यामुळे हवे तितके कर्मचारी मिळणार नाहीत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱयांवरच जि.प. चा गाडा चालवावा लागणार आहे.

Related posts: