|Monday, December 16, 2019
You are here: Home » leadingnews » आता जीएसटी रिटर्न भरा तीन महिन्यांनी !

आता जीएसटी रिटर्न भरा तीन महिन्यांनी ! 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जीएसटी रिटर्न दरमहिन्याला भरावा लागत असल्याने छोटय़ा व्यापाऱयांना मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागत असे. मात्र, आज झालेल्या जीएसटी काऊंसिलच्या बैठकीत जीएसटी रिटर्न तीन महिन्यांनी भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे छोटय़ा व्यापाऱयांना या निर्णयाने दिलासा मिळणार आहे.

या निर्णयानुसार, दीड कोटींपर्यंत वार्षिक उलाढाल असणारे व्यापारी तीन महिन्यांनी जीएसटी रिटर्न भरु शकतात. 75 लाखांपर्यंत वार्षिक उलाढाल असणाऱया व्यापाऱयांना कंपोझिशन स्कीमअंतर्गत एक टक्का टॅक्स देऊन रिटर्न भरण्यातून सूट होती. मात्र, आता ही मर्यादा 75 लाखांवरुन एक कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच 50 हजारांपर्यंतच्या व्यवहारांसाठी पॅनकार्डची अट काढून टाकण्यात आली आहे. मात्र, 50 हजार ते 2 लाखांपर्यंतच्या व्यवहारांसाठी पॅनकार्ड बंधनकारक असेल.

Related posts: