|Sunday, March 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » नोटाबंदीमुळे दहशतवादी कारवाया घटल्या

नोटाबंदीमुळे दहशतवादी कारवाया घटल्या 

नोटाबंदी, जीएसटी, स्वच्छ भारतचा अपेक्षित परिणाम प्राप्त

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत, वस्तू आणि सेवा कर आणि नोटाबंदी यासारख्या पावलांचा अपेक्षित परिणाम झाला आहे. नोटाबंदीनंतर काश्मीरमधील दहशतवादी कारवाया तसेच नक्षली हल्ले मोठय़ा प्रमाणात कमी झाल्याचा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बर्कले इंडिया परिषदेला संबोधित करताना म्हटले. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेत कर मान्यता वाढणे आणि रोकड कमी करण्यास मदत झाली. केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या सुधारणेला जनतेचा पाठिंबा मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.

भारत पुन्हा एकदा आपला विकास दर प्राप्त करून लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल. आम्हाला मोठय़ा लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासमवेत मोठय़ा तरुणाईच्या गरजा पूर्ण कराव्या लागणार आहेत असे जेटली म्हणाले. स्वच्छ भारत, जीएसटी आणि नोटाबंदी यासारख्या पावलांचा दीर्घकाळात लाभ दिसून येईल. काही महिन्यांमध्ये या सर्व निर्णयांचे सकारात्मक परिणाम समोर आल्याचे विश्लेषणात दिसून येते असे जेटली म्हणाले.

हिंसक घटना रोडावल्या

नोटाबंदीनंतर जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगढ यासारख्या राज्यांमधील हल्ले आणि दहशतवादी घटना रोडावल्या आहेत. दहशतवादी घटना सध्या कमी झाल्या असून दगडफेकीचे प्रमाण दिसेनासे झाले. दगडफेक करण्यासाठी दहशतवादी संघटनांकडून युवकांना 500 ते 1000 रुपये दिले जायचे. परंतु ही रक्कमच वाया गेल्याने मागील 8-10 महिन्यामंध्ये दगडफेकच दिसून येत नसल्याचा दावा जेटलींनी केला.

जलद विकासाची गरज

तरुण लोकसंख्येच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे मानले जाते. परंतु ही लोकसंख्या अत्याधिक महत्त्वाकांक्षी होत चालल्याने वेळ पाळणे महत्त्वाचे ठरले. पुढील एक ते दोन शदाकत भारताला अधिक आर्थिक विकासवान देशांच्या गटात सामील व्हायचे असेल तर जलद विकास घडवून आणावा लागेल असे जेटली म्हणाले.

अमेरिकेच्या दौऱयावर

जेटली सोमवारी 7 दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱयावर जातील. ते न्यूयॉर्क आणि बोस्टनमध्ये अमेरिकेच्या उद्योगजगतातील दिग्गजांशी संवाद साधतील. ते वॉशिंग्टनमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीत सामील होतील.

Related posts: