|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खुली निवडणूक घेतली नाही तर बहिष्कार

खुली निवडणूक घेतली नाही तर बहिष्कार 

प्रतिनिधी/ पणजी

 गोवा विद्यापिठामध्ये 16 रोजी होणाऱया निवडणूका खुल्या घेण्यात याव्या व सगळय़ा विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी एनएसयूआयने गेला महिनाभर विद्यापिठाचे कुलगुरु व राज्यपालांकडे मागणी केली तरी अजून यावर त्यांनी काही प्रतिक्रीय दिली नसल्याने आता एनएसयुआयच्या विद्यार्थ्यांनी या मतदनाला बहिष्कार घालण्याचे ठरविले आहे, असे यावेळी एनएसयूआयचे अध्यक्ष एहराझ मुल्ला यांनी पत्रकर परिषदेत सांगितले.

 गेल्या वर्षी या विद्यार्थी परिषदेच्या निवडणूकीमध्ये मतदारांना धमकाविण्याच्या लाच  देण्याच्या घटना घडल्या होत्या, काही जणांना मारहाण केली होती. या विषयी विद्यापिठाच्या कुलगुरुंना तसेच राज्यपालांना माहिती दिली होती पण अजून त्यांवर काहीच कारवाई झालेली नाही. या वर्षी पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी गोवा विद्यापिठाच्या निवडणूका खुल्या घेण्यात याव्या यासाठी एनएसयुआयने राज्यपालांकडे मागणी केली आहे. राज्यपाल व विद्यापिठाचे कुलगुरु भाजप सरकारच्या विरोधात होणार असल्याने हा निर्णय घेते नाही, असा आरोप यावेळी मुल्ला यांनी केला.

 गोवा विद्यापिठाच्या या निवडणूकामध्ये गोव्यातील कॉलेजमधील काही मोजक्या विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क असतो त्यामुळे सत्ताधाऱयांकडून त्यांना धमकाविले जाते त्यांचे अपहरण केले जाते असे प्रकार या वर्षी घडू नये यासाठी निवडणूका खूल्या घ्यावा व राज्यातील सर्व विद्यार्थ्यान मतदान करण्याचा हक्क मिळावा यासाठी ही मागणी केली जात आहे, असे यावेळी नितीन पाटकर यांनी सांगितले.

Related posts: