|Friday, November 15, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Relianceकडून दररोज मिळणार Unlimited Calling

Relianceकडून दररोज मिळणार Unlimited Calling 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रिलायन्स कम्युनिकेशनने खास आपल्या ग्राहकांसाठी आपला नवा फ्रीडम पॅक लाँच केला आहे. कंपनीने हा नवा प्लॅन 349 रुपयांत लाँच केला असून, या नव्या प्लॅनअंतर्गत ग्राहकाला दररोज 1 जीबी डाटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.

याशिवाय कंपनीने आणखी एक प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन 193 रुपयांत मिळणार आहे. या प्लॅनअंतर्गत ग्राहकाला प्रतिदिन 1 जीबीचा 3 जी इंटरनेट डाटा आणि कोणत्याही नेटवर्कवर 30 मिनिटे कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे. या दोन्ही प्लॅनची वैधता 28 दिवसांसाठी असणार आहे. या नव्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना 193 रुपये आणि 349 रुपयांचे रिचार्ज करणे गरजेचे आहे.

Related posts: