|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » युद्ध-प्रलयापासून वाचण्यासाठी आलिशान बंकर

युद्ध-प्रलयापासून वाचण्यासाठी आलिशान बंकर 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

जगभरात देशांमध्ये वाढता तणावा आणि हवामान बदलामुळे वाढत्या नैसर्गिक प्रकोपादरम्यान जीव वाचविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधल्या जात आहेत. एकीकडे सरकार जेथे प्रलयाच्या स्थितीत विशेष लोकांना वाचविण्यासाठी बंकर (खंदक) तयार करत आहे, तर जगभरातील अब्जाधीश देखील स्वतः आणि आपल्या स्वकीयांसाठी आलिशान बंकर तयार करताहेत.

अमेरिका, लंडन आणि जपानमध्ये याप्रकारच्या बंकरच्या निर्मितीचे कार्य सुरू झाले आहे. परंतु काही धनाढय़ा लोकच या सुविधेचा लाभ उचलण्यास सक्षम ठरतील.

700 टक्क्यांनी वाढली अशा आलिशान बंकर्सची 2016 मध्ये

300 टक्क्यांनी वाढली या बंकर्सची निर्मिती जगभरात

1 टक्के लोकांसाठीच उपलब्ध होऊ शकेल ही सुविधा

सर्वप्रकारच्या सुविधांनी सज्ज

-बंकर्समध्ये बेडरुम, ड्रॉइंगरुम, बार, स्वीमिंग पूल, स्पासारख्या आलिशान सुविधा

-एकावेळी अनेक लोक राहणाऱया बंकर्समध्ये चित्रपटगृह आणि शाळा देखील

-अधिक कालावधीच्या वास्तव्यादरम्यान वैद्यकीय व्यवस्थेसाठी मिनी हॉस्पिटल

-जनरल स्टोअर्स आणि वेळ घालविण्यासाठी वाचनालयाची देखील सुविधा

 

अत्याधिक खर्च

25 कोटी 55 लाख रुपयांपर्यंत लंडनमध्ये निर्माण होणाऱया आलिशान बंकरसाठीचा खर्च

5000 लोक राहण्याची व्यवस्था केली जातेय अमेरिकेच्या साउथ डाकोटाच्या बंकरमध्ये

15 लाख ते 01 कोटी 27 लाखांपर्यंतच्या किमतीचे बंकर यात सामील

2500 चौरसमीटर ते 5 हजार चौरस मीटर एवढी असू शकते जागा बंकरमध्ये

Related posts: