|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कामगार विरोधी भूमिका घेणाऱया सहकारमंत्र्यांची हकालपट्टी करा

कामगार विरोधी भूमिका घेणाऱया सहकारमंत्र्यांची हकालपट्टी करा 

सोलापूर /वार्ताहर :

कामगारांना पेन्शन लागू व्हावे व कारखानदारांनी संप मागे घेवून कारखाने सुरू करावे यासाठी कित्येक वेळा आंदोलन केली. मात्र अद्याप ही परिस्थिती तशीच आहे. महाराष्ट्र राज्यातील सहकार मंत्री सुभाष देशमुख कामगारांना न्याय देण्याऐवजी त्यांना कारखानदारांचा पुळका आला आहे. कामगारांच्या विरोधात भूमिका घेणाऱया सहकारमत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी  माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली.

   कामगारांना पेन्शन मिळावे तसेच कारखानदारांनी बंद आंदोलन त्वरीत मागे घेवून कामगारांना पूर्ववत काम देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी सीटू तर्फे  गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी   कॉ. आडम बोलत होते.

  पुढे आडम म्हणाले, सहकार मंत्री आणखी किती दिवस कारखानदारांच्या पाठीशी राहणार आहेत. सहकार मंत्र्यांनी कामगार विरोधी भूमिका घेतल्यास एक दिवस कामगार त्यांना मातीत घातल्याशिवाय सोडणार नाही. सहकारी मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, कामगार आयुक्त बी.आर. देशमुख या तीन देशमुखांमुळे आपल्या सोलापूरला ग्रहण लागलेले असल्याचे कॉ. आडम म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी माजी पेंद्रीय गृहराज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर ही जोरदार टिका केली.

Related posts: