|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यातील महामार्ग बनणार ‘हरित महामार्ग’

राज्यातील महामार्ग बनणार ‘हरित महामार्ग’ 

प्रतिनिधी/ पणजी

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हरित महामार्ग धोरणानुसार गोव्यातील 261 कि.मी लांबीच्या महामार्ग पट्टय़ात विविध प्रकारची झाडे लावण्यात येणार आहे. यावर सुमारे 64 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. याबाबतचा सामंजस्य करार गोवा साधनसुविधा विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात काल दक्षिण गोव्यात झाला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, सा.बा.खा मंत्री सुदिन ढवळीकर, साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पाऊसकर यांची उपस्थिती होती.

एकूण पाच महामार्गावर ही झाडे लावण्यात येणार आहे. फळ झाडे आणि अन्य स्थानिक फुलझाडे लावली जाणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष दीपक पाऊसकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राष्ट्रीय महामार्ग एनएच 17 वर पत्रादेवी ते पोळे या 133 कि.मी च्या पट्टय़ा झाडे लावली जातील. त्यावर 32 कोटी 65 लाख रुपये खर्च केले जातील. राष्ट्रीय महामार्ग 44 वर 15 कि.मी. च्या पट्टय़ात गालजीबाग ते पोळे पर्यंतच्या अंतरात झाडे लावली जातील त्यावर 3.37 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. एनएच 17 बी महामार्गावर फर्मागुढी सर्कल ते वर्णापुरी या 20 कि.मी.च्या अंतरात 5.64 कोटी खर्चून झाडे लावण्यात येतील. एनएच 44 या महामार्गावर धारगळ ते उसगाव पर्यंतच्या 50 कि.मी अंतरात 11.21 कोटी खर्चून झाडे लावण्यात येतील. एकूण 261 कि.मीच्या पट्टय़ात 64 कोटी 37 लाख रुपये खर्चून झाडे लावली जातील. या प्रकल्पाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. मंगेश प्रभुगावकर यांनी या प्रकल्पाचा अहवाल तयार केला आहे.

ही झाडे कोणत्या प्रकारची लावावी याबाबत बॉटेनिष्ट व अन्य तज्ञ लोकांकडे चर्चा केली जाणार आहे. शक्यतो फळे देणारी झाडे व स्थानिक फुलझाडे लावण्यात येणार आहे. असेही त्यांनी सांगिते. दक्षिण गोव्यातील हॉटेल लीला बीच येथे हा सामंजस्य करार झाला.

Related posts: