|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » काश्मीरमध्ये शिक्षकाची हत्या, दहशतवाद्यांवर संशय

काश्मीरमध्ये शिक्षकाची हत्या, दहशतवाद्यांवर संशय 

श्रीनगर / वृत्तसंस्था

काश्मीरमधील शोपियान जिल्हय़ात बुधवारी एका शिक्षकाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. एजाझ अहमद असे शिक्षकाचे नाव असून त्याच्या अंगावर शस्त्राने वार केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहेत. मात्र, ही हत्या कोणाकडून झाली याबाबत तपास यंत्रणांना साशंकता आहे. हत्या झालेल्या शिक्षकाच्या निवासस्थानात मागील आठवडय़ातच तुंबळ चकमक झाली होती. या शिक्षकाच्या घरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम हाती घेतली होती. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात होते. या चकमकीनंतर आठवडय़ाभरातच सदर शिक्षकाची हत्या झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. सध्या हत्येच्या संशयाची सुई दहशतवाद्यांवरच व्यक्त केली जात आहे. एजाझ अहमद यांचा मृतदेह घरापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावरील मोकळय़ा जागेत आढळून आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Related posts: