|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सुरूची राडा प्रकरणातील चार आरोपींना दुसऱया गुन्हयात अटक

सुरूची राडा प्रकरणातील चार आरोपींना दुसऱया गुन्हयात अटक 

प्रतिनिधी/ सातारा

सुरूची राडा प्रकरणात शाहुपूरी पोलिस ठाण्यात एकुण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी शाहुपूरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले या दोन्ही राजेगटा विरोधात फिर्याद दिली आहे. तर उदयनराजे गटाकडुन अजिंक्य मोहिते यांनी तर शिवेंद्रसिंहराजे गटाकडुन विक्रम पवार यांनी फिर्याद दिली आहे, असे एकुण तीन गन्हे याप्रकरणी दाखल आहेत. पैकी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल असलेल्याल्या गुन्हयात कारागृहात असलेले किरण अनिल कुऱहाडे (रा. करंजे पेठ सातारा) केदार विलास राजेशिर्के (रा. यादोगोपाळ पेठ सातारा) तसेच उत्तम यशवंत कोळी (रा. राजसपुरापेठ, सातारा), व निखिल संजय वाडकर (रा. करंजेपेठ, सातारा), या चौघांना दुसऱया गुन्हयात वर्ग करून अटक करण्यात आले आहे.