|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » शेतकरी, गावकऱयांची खाजन पिकांची लागवड व पुनरुज्जीवनाची मागणी

शेतकरी, गावकऱयांची खाजन पिकांची लागवड व पुनरुज्जीवनाची मागणी 

प्रतिनिधी /पणजी :

बंधाऱयाचा भंग करून स्लुईल गेटद्वारे खारट पाणी सोडले जाते ज्यामुळे खाजन शेतीतील शेतजमीन या भागातील शेतीसाठी अशक्य करून टाकते. जी या गावांच्या अर्थव्यवस्थ्सेची मुख्य आधार होती. या पुराचा खाजन जागेवरती परीणाम होत असल्याने नेवरा, मंडुर, करमळी व जवळील भागतील शेतकरी तसेच गावकऱयांनी यावर राग व्यक्त केला असून त्यावर कारवाई करण्यात संबंधित अधिकाऱयांकडून संपूर्णपणे निश्काळजिपणा केला जात असल्याने याचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे अशी चर्चा नुकत्याच झालेल्या खाजन एक्शन कमिटीहच्या बैठकीत झाली.

ही बैठक नेरुळ, दामदा, ओफ्ढला, धोंगजो आणि सेंट मेथीव टेनंट या संबंधित असून यात नेवरा, मंडूर, करमळी आणि इतर भागातील शेतकऱयांचाही समावेश होता. सदर बैठक डॉ. नंदकुमार कामत, प्रा. नागेश कोलवाळकर, स्थानिक आमदार फ्ढ्रान्सिस सिल्वेरा, खाजन एक्शन कमिटीचे संयोजक प्रा. रामराव वाघ, यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. नेवरा गावचे सरपंच उज्वला नाईक यांनी ओळख करून †िदली तर अझोसी मंडुर येथील सरपंच अजित बकाल यांनी आभारप्रकटन केले.

सुनिल नाईक, करमळीचे पंचसदस्य, रामचंद्र नाईक, तुळशिदास काणकोणकर, ऍड. शैला नाईक, काशिनाथ नाईक, फ्ढ्रान्सिस फ्ढर्नांडिस, साजू नाईक या सर्वांनी यावर आपापले विचार मांडले असून त्यांनीही शेतकऱयांना होत असलेली हानी प्रथम दुर करावी व पुन्हा हे गाव पहिल्यासारखे करावे असे सांगितले.

Related posts: