|Monday, September 16, 2019
You are here: Home » विविधा » युरोपातील जनजीवनात हिंदू समाजाचे योगदान मोठे : टेरिजा मे

युरोपातील जनजीवनात हिंदू समाजाचे योगदान मोठे : टेरिजा मे 

 लंडन / पीटीआय :

ब्रिटन आणि युरोपातील जनजीवनात हिंदू समाजाने मोठे योगदान दिले आहे. वर्षभर चालणाऱया विविध धार्मिक उत्सवांमुळे आमची संस्कृती अधिक समृद्ध झाली आहे, असे गौरवोद्गार ब्रिटनच्या पंतप्रधान टेरिजा मे यांनी येथे काढले.

अग्रणीचे अनिवासी भारतीय व्यावसायिक हिंदुजा ब्रदर्स यांच्या निवासस्थानी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयोजित समारंभात एका संदेशाचे वाचन करण्यात आले. त्यामध्ये टेरिजा म्हणाल्या, विविध सणांतून हिंदू संस्कृतीचे सर्वश्रेष्ठ रूप पाहायला मिळते. दिवाळीच्या निमित्ताने आयुष्याकडे बहारदार पद्धतीने पाहता येते. आदर-सन्मान यांची शिकवण देतानाच भविष्य बदलताना गतकाळात घडलेल्या गोष्टींचा आवश्यक तो आदर ठेवला पाहिजे.

ब्रिटनचे विदेश सचिव बोरिस जॉन्सन म्हणाले, आमचा देश आणि ब्रेक्झिट याबद्दल मीडियात बऱयाच उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यामुळे औदासीन्य येते. मात्र, आमच्या मनातील अंधकार दूर होऊन नवीन आशेचा किरण निर्माण होणार आहे.

हिंदुजा ग्रुपचे सहअध्यक्ष जी. पी. हिंदुजा म्हणाले, सणांमुळे भूतकाळातील सर्व गोष्टी विसरून नवा अध्याय सुरू करता येतो.