|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आष्टय़ात जादूटोणा करुन फसवणूक करणाऱया महिलेसह दोघांना अटक

आष्टय़ात जादूटोणा करुन फसवणूक करणाऱया महिलेसह दोघांना अटक 

वार्ताहर /आष्टा :

आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून त्याव्दारे मुल न होणे, करणी करणे, भूतबाधा काढणे, लग्न जमवत नसल्यास जमवून देणे यावर अघोरी उपाय करुन सर्वसामान्यांच्या मनात भिती निर्माण करत फसवत असलेल्या एका महिलेसह दोघांना आष्टा पोलिसांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या सहकार्याने ताब्यात घेतले. गुरुवारी दुपारी आष्टा पोलिसांनी ही कारवाई केली.

कल्पना प्रकाश आत्तरकर (वय 35), राहणार पाचुंब्री, ता. शिराळा, जिल्हा सांगली व मुबारक महमंद नदाफ (वय 52) राहणार मालगाव, महादेव मंदिराजवळ ता. मिरज, जिल्हा सांगली अशी आष्टा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीतांची नावे असून आष्टा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत आष्टा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, आष्टा येथील शिवाजी चौकातील रोणाक्ष ब्युटी पार्लरच्या मागील खोलीत कल्पना आत्तरकर व मुबारक नदाफ हे दोघे अंधश्रध्दा पसरवत लोकांची दिशाभूल करीत असल्याची माहिती अंधश्रध्दा निर्मूलन समितीला मिळाली होती. लोकांच्या वेगवेगळया समस्यांवर अघोरी उपाय सांगून नागरिकांना आर्थिक गंडा घालण्याचे कामही हे दोघेजण करत आहेत. अशा तक्रारी वाढल्या होत्या.

या माहितीवरुन अंध्दश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, कार्यकर्ते भगवान गोविंद रणदिवे, अवधूत बापूसाहेब कांबळे, अजय शंकर भालकर, यांनी समितीच्या कार्यकर्त्या व समाजसेविका सौ. सुनिता संजय घोरपडे यांच्या मदतीने अंधश्रध्देचा प्रकार उजेडात आणला. सौ. सुनिता घोरपडे यांनी गुरुवारी दुपारी कल्पना आत्तरकर व मुबारक नदाफ यांच्याकडे जावून माझ्या नवरा दुसऱया बाईच्या नादी लागला आहे. ती बाई त्यांना सोडत नाही, असे सांगितले त्यावेळी कल्पना आत्तरकरने त्यांना अघोरी उपाय सांगितला. तसेच मुबारक नदाफ याने गव्हाच्या पिठात साखर घालून ते माशांना खाऊ घाला असे सांगून तसे न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील व तुमचा नवरा असाच बाहेरख्याली राहील असे सांगितले व मनात भिती निर्माण करुन तीन हजार रुपयांची मागणी केली. तसेच सुनिता घोरपडे यांच्याकडून पाचशे रुपयेही घेतले.

Related posts: