|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » घनवट, दीपक पाटीलची संपत्ती उत्पन्नापेक्षा जास्त

घनवट, दीपक पाटीलची संपत्ती उत्पन्नापेक्षा जास्त 

प्रतिनिधी/ सांगली

  वारणानगरमधील शिक्षक कॉलनीत झालेल्या नऊ कोटी 18 लाखांच्या चोरी प्रकरणी कोल्हापूर सीआयडीने अटक केलेले मुख्य संशयित पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि कर्मचारी दीपक पाटील यांची संपत्ती उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचे सीआयडीच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संपत्ती उत्पन्नाच्या मार्गाचा खुलासा करण्याची नोटीस दोघांनाही सीआयडीने बजावली आहे.  तर पसार साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद कुरळपकरला फरार घोषित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

 स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, साहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, कर्मचारी दीपक पाटील, रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सातही पोलीस आणि अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले आहे.

 कोल्हापूर सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. सीआयडीने आतापर्यंत कुरळपकर वगळता सर्वांनाच अटक केली आहे. घनवटसह काहीजणांवर दोषारोपपत्रही पन्हाळा न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. पण, कुरळपकर अद्याप सीआयडीच्या हाती लागला नाही. त्याच्या अटकेसाठी प्रयत्न करूनही कित्येक महिन्यापासून त्याला पकडण्यासाठी सीआयडीला यश आले नसल्याने त्याला फरार घोषित करण्याची प्रक्रिया सीआयडीने सुरू केली आहे. लवकरच त्याला फरार घोषित करून त्याच्या मुसक्या आवळण्यात येण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.

   घनवट, पाटीलच्या घबाडाची चौकशी

 चोरीप्रकरणी सीआयडीने अटक केलेल्या सर्व पोलीस आणि अधिकाऱयांच्या संपत्तीची चौकशी सीआयडीने सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येकाच्या घरी आणि त्यांच्या बँक खात्यांची चौकशी करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि पोलीस कर्मचारी दीपक पाटील यांची संपत्ती त्यांच्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. सीआयडीने चौकशी करूनही त्या दोघांचे उत्पन्न आणि जमवलेली संपत्ती यांचा मेळ लागत नसल्याने त्यांना संपत्तीबाबत खुलासा करण्याच्या नोटीसा पाठवल्या आहेत.

  त्यांच्याकडून खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त मिळवलेली संपत्ती ही भ्रष्टाचार समजूनही कारवाई होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Related posts: