|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » एमआरपीएल मालकी बदलणार

एमआरपीएल मालकी बदलणार 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हिंदुस्थान पेट्रोलियम मंगलोर रिफायनरीचा ताबा घेण्याची शक्यता आहे. समभागांची अदलाबदल करत मंगलोर रिफायनरी खरेदी करण्यात येईल असे सांगण्यात येते. या खरेदीनंतर हिंदुस्थान पेट्रोलियम देशातील दुसऱया क्रमांकाची तेलशुद्धीकरण कंपनी बनेल. एचपीसीएलचे अधिग्रहण ओएनजीसीकडून पूर्ण करण्यात आल्यानंतर हा व्यवहार होण्याची शक्यता आहे. डिसेंबर अथवा जानेवारीमध्ये ओएनजीसी आणि एचपीसीएल यांच्यातील व्यवहार पूर्ण रोखीने होईल. सध्या मंगलोर रिफायनरी ओएनजीसीची उपकंपनी आहे. या कंपनीतील 71.63 टक्के समभाग ओएनजीसीकडे आहेत, तर 16.96 टक्के एचपीसीएलकडे आहेत. सरकार आपल्याकडील एचपीसीएलमधील संपूर्ण 51.11 टक्के समभाग ओएनजीसीला विक्री करणार आहे.

Related posts: