|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठा इन्फंट्रीतर्फे शानदार पूर्वरंग सोहळा

मराठा इन्फंट्रीतर्फे शानदार पूर्वरंग सोहळा 

प्रतिनिधी / बेळगाव

येथील मराठा लाईट इन्फंट्री केंद्राच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ध्वज हस्तांतरण सोहळय़ाचा पूर्वरंग समारंभ पार पडला. केंद्रातील तळेकर ड्रील स्क्वेअर येथे आयोजित कार्यक्रमाला मराठा इन्फंट्रीच्या वरि÷ अधिकाऱयांनी उपस्थिती दर्शविली होती.

दि. 3 रोजी भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वज हस्तांतरण सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळय़ाला मराठा इन्फंट्री केंद्राचे अन्य वरि÷ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमाची एक शानदार झलक दाखविणारा पूर्वरंग सोहळा बुधवारी पार पडला. यामध्ये संचलनाच्या सोहळय़ासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. याची अनुभुती अधिकारी व सैनिकवर्गाने घेतली.

त्याचप्रमाणे दि. 1 नोव्हेंबर 2009 रोजी 24 मराठा या तुकडीची बेळगावात स्थापना झाली होती. दि. 1 नोव्हेंबर 2010 रोजी 23 मराठा या तुकडीची स्थापना कोल्हापूर येथे झाली होती. त्याचा वर्धापन दिन देखील या कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.