|Sunday, December 8, 2019
You are here: Home » leadingnews » डीएसकेंचा अटकपूर्व जामीन मंगळवारपर्यन्त मंजूर; तात्पुरता दिलासा

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन मंगळवारपर्यन्त मंजूर; तात्पुरता दिलासा 

 पुणे / प्रतिनिधी  :

डीएसके कंपनीचे मालक डी. एस. कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारपर्यन्त मंजूर करण्यात आला असून, याबाबत मंगळवारी पुन्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.त्यामुळे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.  

डीएसके यांच्यासह त्यांच्या पत्नीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणात अटक टाळण्यासाठी डीएसके यांनी ऍड. श्रीकांत शिवदे यांच्यामार्फत अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात शुक्रवारी अर्ज दाखल केला होता. या अंतरिम जामीनावर शनिवारी न्यायालयात सुनावणी झाली. डीएसकेचा यांचा अटकपूर्व जामीन मंगळवारपर्यन्त  न्यायालयाने मंजूर केला असून, त्यावर मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.  

आर्थिक गुन्हे शाखेने डीएसके यांच्या पुणे व मुंबई येथील निवासस्थान आणि कार्यालयांवर छापा टाकून महत्त्वपूर्ण दस्तावेज जप्त केला आहे. या कागदपत्रांची, हार्डडिस्कची छाननी करत पोलिसांनी डीएसकेंच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. मुदतठेवीवर चांगल्या परताव्याचे आमिष दाखविल्याने डीएसकेंच्या विविध कंपनीत नागरिकांनी मोठया प्रमाणावर गुंतवणूक केली. ठेवीदारांना त्यांची मुद्दल अथवा व्याज परत मिळत नसल्याने त्यांनी डीएसकेंकडे पाठपुरावा करत पैशांची मागणी केली. मात्र, डीसकेंनी गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे अद्याप परत न केल्याने पोलिसांनी डीएसकेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपासाकरिता एका विशेष पथकाची नियुक्ती केली. या पार्श्वभूमीवर अटक टाळण्यासाठी डीएसकेंनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.

Related posts: