|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » हिमाचल प्रदेशात पुन्हा काँग्रेसची सत्ता नाही : पंतप्रधान

हिमाचल प्रदेशात पुन्हा काँग्रेसची सत्ता नाही : पंतप्रधान 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा कधीही काँग्रेसची सत्ता येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. तसेच राज्यात काँग्रेसनेही निवडणुकांच्या आधीच पराभव मान्यच केला असल्याचे ते म्हणाले.

रैत येथील जाहीर सभेत पंतप्रधान बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेसला हिमाचलमधून हद्दपार करा आणि भारतीय जनता पक्षाला निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. काँग्रेस पक्षातील नेत्यांचाच काँग्रेस पक्षावरुन विश्वास उडाला आहे. पक्षावरुन विश्वास उडालेले काँग्रेस नेते इतर पक्षांमध्ये जागा मिळते का, यासाठी प्रयत्न करत आहेत. हिमाचल प्रदेशात पुन्हा कधीही काँग्रेसची सत्ता येणार नाही, असेही ते म्हणाले.