|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सरवडेत सापडला 13 फूट लांब आणि 15 किलो वजनाचा अजगर

सरवडेत सापडला 13 फूट लांब आणि 15 किलो वजनाचा अजगर 

सरवडे / प्रतिनिधी

     राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील आंबेओहळ नावाने ओळखल्या जाणाया प्रगतशील शेतकरी सचिन लाड यांच्या शेतातअजगर पकडण्यात आले. हे अजगर 13 फूट लांब आणि 15 किलो वजनाचे असुन ते अजगर मादी जातीचे आहे.पकडलेल्या अजगराला दाजीपुरच्या अभयारण्यात सोडण्यात आले.

      सरवडे येथील सरवडे-कासारपुतळे रस्त्यावर आंबेओहळ नावाच्या भागात प्रगतशील शेतकरी सचिन बाबुराव लाड यांची शेती आहे. मंगळवारी सकाळी 7 वाजता त्यांच्या शेतात सरसेनापती कारखान्याचे ऊस तोडणी कामगार ऊस तोडण्यासाठी आले होते. ऊस तोडणी करताना त्यांना भले मोठे अजगर पहावयास मिळाले.त्यांनी शेतात अजगर असल्याची माहिती शेत मालक सचिन लाड यांना सांगितले.लाड यांनी तात्काळ मालवे काँलनीतील य सर्प मित्र ऋषिकेश फुटाणकर यांना मोबाईल वरुन माहिती दिली ते आपल्या मित्रासोबत अजगर असणाया ठिकाणी आले. त्यांनी मोठय़ा चलाखीने आणि धाडसाने ताबडतोब अजगरला पकडले.पकडलेले अजगर हे मादी जातीचे असुन त्याचे वजन 15 किलो तर लांबी 13 फुट इतकी आहे.ते आठ वर्षाचे आहे. पुराच्या पाण्याने ते वाहून आले असावे असा अंदाज आहे.

      सर्पमित्र फुटाणकर म्हणाले, शक्यतो अशा स्वरुपाचे अजगर घनदाट जंगलात आढळते. ते सर्वांतमोठे बिनविषारी सर्प म्हणून ओळखतात. सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनीउपकुलात त्याचा समावेश होतो. जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जातीआढळतात.हे मादी 8 – 100 अंडी घालते. पिलेबाहेर येईपर्यंत मादी अंडय़ासोबत राहून अंडय़ाचे रक्षण करते. शरीराचेआकुंचन-प्रसरण करून ती आवश्यकतेनुसार अंडय़ांसाठी ऊब निर्माण करते.

      मानवप्राणी अजगराचे नैसर्गिक भक्ष्यनाही. तो अजगराचा सर्वात प्रमुख शत्रू मात्र आहे. काही आदिवासी खाण्यासाठीअजगराची शिकार करतात. काही वेळा भीतीपोटीही ते अजगर मारले जातात. अजगराच्याकातडय़ापासून पर्स,पट्टे वगैरे तयार केले जातात.पकडलेल्या अजगराला दाजीपुरच्या जंगलात सोडण्यात आले.