|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » leadingnews » नोटाबंदी वर्षपूर्ती ; राज्यभरात सरकारविरोधात आंदोलन

नोटाबंदी वर्षपूर्ती ; राज्यभरात सरकारविरोधात आंदोलन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त विरोधकांकडून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. नाशिक,औरंगाबाद आणि जळगाव इथे नोटाबंदीच्या वर्षपूर्तानिमित्त निषेध नोंदवला गेला.

मुंबईत राष्ट्रवादीतर्फे आझाद मैदानात नोटाबंदीचे वर्षश्राद्ध घालण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे सहभागी झाले. तर पुण्यात नोटाबंदीच्याविरोधात राष्ट्रवादीने मोर्चा काढला. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्र येऊन सरकरचा निषेध केला. सोलापूरातही काँग्रेसने नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काळा दिवस साजरा करून आंदोलन केले तर भाजपाने भ्रष्टाचार विरोधी दिवस म्हणून नोटाबंदीच्या समर्थनार्थ उत्सव साजरा केला.

दुसरीकडे जळगावात काँग्रेसने श्राद्ध घालून नोटाबंदीच्या निर्णयाला चुकीचे ठरवले. तर औरंगाबादेत काँग्रेसनेच मुंडन करून नोटाबंदीचा निषेध केला.नाशिकमध्येही काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी रामकुंडावर नोटाबंदीचे श्राद्ध घातले.

 

Related posts: