|Sunday, January 26, 2020
You are here: Home » leadingnews » कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपी दोषी ; 22 नोव्हेंबरला शिक्षेची सुनावणी

कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपी दोषी ; 22 नोव्हेंबरला शिक्षेची सुनावणी 

ऑनलाईन टीम / अहमदनगर  :

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी  न्यायालयाने  तिन्ही आरोपींना दोषी ठरवले असून येत्या 22 नोव्हेंबरला शिक्षेची सुनावणी होणार आहे.

अहमनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13जुलै 2016 राजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती.याप्रकरणी जितेंद्र शिंदे,संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. राज्यभरात काढण्यात आलेल्या मराठा मूक क्रांती मोर्चाच्यावेळी कोपर्डी प्रकारणातील दोषींना फाशी देण्यात यावी,अशी प्रमुख मागणी लावून धरण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवू,असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता येत्या 22 नोव्हेंबरला या नरधमांना काय शिक्षा मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

Related posts: