|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » विराट‘पन्नाशी’

विराट‘पन्नाशी’ 

ऑनलाईन / कोलकाता :

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रीलंकेविरूद्ध कसोटी सामन्यात आज त्याने शतकी खेळी करून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शतकांची ‘पन्नाशी’ गाठली आहे.

कसोटीतील हे त्याचे 18वे शतक आहे. वनमध्ये विराटने आतापर्यंत 32 शतके झळकावली आहेत. सर्वाधिक शतकांच्या यादीत विराटच्या पुढे आता भारताचा सचिन तेंडुलकर हा एकमेव खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती स्वीकारलेल्या सचिनच्या नावावर वन-डे सामन्यात 49 शतके जमा आहे.याव्यतिरिक्त कसोटी क्रिकेटमध्ये सचिनने 51 शतके केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर 100 शतके जमा आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सचिन तेंडूलकरने सर्वाधिक(51),राहुल द्रविड(36), सुनील गावसकर(34), सेहवाग(23), मोहम्मद अझरूद्दीन(22)शतके झळकावली आहेत.