|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाणींतून नव्हे, रोखे व्यवहारातून पैसे कमावले

खाणींतून नव्हे, रोखे व्यवहारातून पैसे कमावले 

प्रतिनिधी/ पणजी

दिगंबर कामत यांचे पुत्र योगिराज कामत यांची एसआयटीने काल बुधवारी दोन तास उलटतपासणी केली. गुरुवारी दिगंबर कामत यांचे मेहुणे संदेश लवंदे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

योगिराज यांचा खाण घोटाळ्यात किती हात आहे याची चाचपणी पोलीस करीत आहेत. वडील मुख्यमंत्री व त्यातल्या त्यात खाण खात्याचा ताबा सांभाळत असल्यामुळे बंद पडलेल्या पडिक खाणी सुरू करून खनिज विकण्यात आल्याचा आरोप होत होता.

आपण खाण व्यवसायात नसून रोखे व्यवहारात आहे. या व्यवहारातच आपण पैसे कमावल्याचे योगिराज यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी बेहिशेबी मालमत्तांचीही चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, दिगंबर कामत यांचे मेहुणे संदेश लवंदे यांना गुरुवारी एसआयटीसमोर  हजर राहण्याचा समन्स बजावण्यात आला आहे. दिगंबर कामत यांनी मेहुण्याच्या मार्फत विविध ठिकाणी गुंतवणूक केल्याचा संशय एसआयटीला असून त्याची चौकशी सध्या चालू आहे.