|Monday, August 19, 2019
You are here: Home » क्रिडा » झहीर-सागरिका अखेर विवाहबंधनात

झहीर-सागरिका अखेर विवाहबंधनात 

वृत्तसंस्था /मुंबई/कोल्हापूर :

टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान व कोल्हापूरची कन्या व चक दे इंडिया फेम अभिनेत्री सागरिका घाटगे अखेर गुरुवारी मुंबईत विवाहबद्ध झाले. विशेष म्हणजे, टीम इंडियाचा स्टार गोलंदाज झहीर व सागरिका यांनी निकाह व सप्तपदीचा पर्याय टाळत नोंदणी पध्दतीने विवाह केला. 

भारताच्या 2011 सालच्या विश्वचषकाचा हिरो व हिंदी-मराठीत मोजकेच चित्रपट करणारी सागरिका घाटगे यांची ओळख एका कॉमन मित्राने करुन दिली होती. या ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले.  चक दे इंडियातून खरी ओळख मिळालेल्या सागरिकाने काही मराठी चित्रपटात काम केले आहे. झहीर हा उद्योजक असून क्रिकेटमध्ये समालोचकाचे कामही करतो. झहीर हा श्रीरामपूरचा असून सागरिका ही कोल्हापूरच्या घाटगे घराण्यातील आहे.

गुरुवारी मुंबईत विवाह नोंदणी कार्यालयातील सोहळय़ाला माजी गोलंदाज आशिष नेहरा, झहीरचा जवळचा मित्र परिवार व कुंटुबिय उपस्थित होते. 27 नोव्हेंबरोजी हॉटेल ताज पॅलेसमध्ये ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. यावेळी क्रिकेट जगतातील, राजकीय नेते व बॉलिवूडमधील स्टार मंडळी उपस्थित राहणार आहे. लंकेविरुद्ध दुसऱया कसोटीमुळे टीम इंडियातील सदस्य या सोहळय़ाला उपस्थित राहाणार नाहीत.  क्रिकेट व बॉलिवूडमधील नात्याची परंपरा अनेक वर्षे आहे. सौरव गांगुली-नगमा, मोहम्मद अझरुद्दीन-संगीता बिजलानी, हरभजन-गीता बासरा, युवराज-हेजल या जोडप्यांनी क्रिकेट-बॉलिवूडमधील नाते आणखी घट्ट केले आहे. भविष्यात शर्मिला टागोर-टायगर पतोडी यांच्यासारखे नाते घट्ट रहावे, यासाठी चाहत्यांकडून त्यांना शुभेच्छा.