|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कुरूंदवाड पालिका कर्मचाऱयांचे काम बंद आंदोलन

कुरूंदवाड पालिका कर्मचाऱयांचे काम बंद आंदोलन 

प्रतिनिधी /कुरूंदवाड :

नगरपालिकेच्या दिवाबत्ती विभागातील कर्मचाऱयांना येथील पाणीपुरवठा सभापती दीपक गायकवाड यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकी देत हिन वागणूक दिल्याच्या निषेधार्थ गुरूवारी पालिकेच्या सर्व विभागातील सर्वच कर्मचाऱयांनी कामबंद आंदोलन करून पालिका प्रवेशद्वारातच ठिय्या आंदोलन केले. नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या उपस्थितीत सभापती गायकवाड यांनी माफी मागीतल्यानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले.

दिवाबत्ती विभागाकडील विनायक कांबळे आणि मोहन शिकलगार हे दोघे बुधवारी सायंकाळी शहरातील विविध ठिकाणी खांबावर गेलेल्या ठिकाणी बल्ब घालण्याचे काम करत होते. यावेळी सभापती गायकवाड यांनी महेश राजपूत या कर्मचाऱयाला भ्रमणध्वनी करून मी सांगितलेल्या ठिकाणीच प्रथम बल्ब घाला. तुम्हाला इतरत्रचे ठिकाणी कुणी सांगितले, असे विचारत मुख्याधिकारी राजेंद्र मुतकेकरसह कर्मचारी विनायक कांबळे, मोहन शिकलगार यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. भ्रमणध्वनीमध्ये रेकॉर्ड झालेले हे संभाषण पालिकेच्या इतर कर्मचाऱयांना सांगून रजपूत, कांबळे आणि शिकलगार यांनी सभापती गायकवड यांच्या हिन वागणूक आणि धमकींना कंटाळल्याची तक्रार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नंदू चौधरी आणि उपाध्यक्ष रिजवान मतवान यांच्याकडे केली.

या घटनेची दखल घेऊन पालिकेच्या सर्वच विभागातील कर्मचारी संतप्त झाले. त्यांनी तातडीने काळी फित लावून पालिका प्रवेशद्वारावर दीपक गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणा देत काम बंद ठेवून ठिय्या आंदोलन केले. यावेळी विरोधी भाजपा आघाडीच्या सर्व नगरसेवकांसह गौतम ढाले, सिकंदर सारवान, आयुब पट्टेकरी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

Related posts: