|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आराम बसला भीषण आग, दोघा तरुणांचा होरपळून मृत्यू

आराम बसला भीषण आग, दोघा तरुणांचा होरपळून मृत्यू 

वार्ताहर /साळवण :

 कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्गावर लोंघे (ता. गगनबावडा) गावानजीक हनुमान मंदीरासमोर आत्माराम ट्रव्हल्सच्या लक्झरी बसला अचानक लागलेल्या आगीत बस जळून भस्मसात झाली. यात बंटीराज भट (वय 24, रा. रोशनपुरा, भोपाळ मध्यप्रदेश), विकी मदन भट (वय 24, रा. रोशनपुरा हडपसर, वैद्यवाडी, इंदिरानगर, गल्ली नं 2, पुणे) यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या घटनेची नोंद गगनबावडा पोलिसात झाली आहे.

  घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, आत्माराम ट्रव्हल्सची बस गुरुवारी रात्री साठेआठ वाजता मडगाव गोवा येथून मुंबईला निघाली होती. यामध्ये अठरा प्रवासी होते. बंटीराज व विकी भट हे आपल्या इतर साथीदारांसह मडगाव येथे लग्न समारंभात वाजंत्री म्हणून गेले होते.  बस रात्री साडेबाराच्या सुमारास कणकवली येथे जेवणासाठी थांबली. जेवण आटोपल्यानंतर बस कणकवलीहून कोल्हापूरच्या दिशेने निघाली. गगनबावडा तालुक्मयातील लोंघे गावाजवळ  लाईट बंद पडल्याने बसचालक शहाबाज रखांगी खाली उतरला. यावेळी  बसने पुढील बाजूने पेट घेतल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने बसमधील झोपेत असलेल्या प्रवाशांना जागे करुन खाली उतरले.

  दरम्यान,  काही क्षणातच संपूर्ण गाडीने पेट घेतली, प्रवाशांना उतरत असताना चालकाने बसच्या मागील बाकडय़ावर मद्यधुंद अवस्थेत झोपी गेलेल्या बंटीराज व विकी यांना जागे करुन उठविण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रवाशांना सुखरुप वाचविण्याच्या धडपडीत हे दोघे उतरले की नाही, हे अंधार असल्यामुळे लक्षात आले नाही, दरम्यान काही वेळातच बसने पूर्णपणे पेट घेतला. त्यामुळे बसमध्ये असलेल्या बंटीराज व विकी यांचा होरपळून मृत्यू झाला.

Related posts: