|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जिल्हा बँकेच्या एटीएम कार्डात ‘गोलमाल’

जिल्हा बँकेच्या एटीएम कार्डात ‘गोलमाल’ 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

 दौलत कारखान्यातीलल साखर चोरी, लक्ष्मीपुरी शाखेतील 35 लाखांचा अपहार प्रकरण ताजे असतानाच आत जिल्हा बँकेतील एटीएम मशिन आणि कार्डमध्ये गोलमाल असल्याचे पुढे आले आहे. बँकेकडून देण्यात आलेली एटीएम कार्ड अन्य खात्याशी लिंक झाल्याने खातेदारांच्या खात्यावरील रक्कम परस्पर गायब होत आहे. चार दिवसांपूर्वी लक्ष्मीपुरी येथील महिला शाखेत हा प्रकर उघडकीस आल्याने खातेदारांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान एका शिक्षक खातेदारांने प्रशासनाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला, मात्र बोळवण करीत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते.

याबाबत समजलेली माहिती अशी, जिल्हा बँकेत शासकीय, निमशासकीय नोकरदारांचे पगार जमा होतात. खातेदार आणि बँकेचा वेळ वाचवण्यासाठी खातेदारांना बँकेकडून रूपे एटीएम कार्ड देण्यात आलेली आहेत. गत महिन्यात बँकेतील काही खातेदारांना ही एटीएम कार्ड मिळाली. ऑक्टोबर महिन्यातील लक्ष्मीपुरी शाखेत काही शिक्षकांचे पगार जमा झाले. पगार जमा झाल्यानंतर एका शिक्षकांने खात्यावरी 9 हजार रूपये काढले. मात्र त्यांना मोबाईलवर एसएमस  आला नाही. त्यांनी बँकेत चौकशी केली असता त्यांच्या खात्यावरून विड्रॉल झाले नाही. त्यांच्या खात्याऐवजी दुसऱयाच शिक्षकाच्या खात्यावरील रक्कम मिळाली होती. चार दिवसापूर्वी हा गंभीर प्रकार विड्रॉल झालेल्या खातेदाराच्या लक्षात आले. त्यानंतरही दोन वेळा त्यांच्या खात्यावरील पैसे कमी झाले. याबाबत संबधीत खातेदाराने लक्ष्मीपुरी शाखेती व्यवस्थापकाकडे चौकशी केली. मात्र उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे समजते. भोंगळ कारभारास वैतागलेल्या त्या खातेदाराने थेट मुख्यालयात तोंडी तक्रार केली. मात्र त्याठाकणीही असाच अनुभव आला. वाद घातल्यानंतर रूपे कार्डच्या कंपनीशी संपर्क साधल्यानंतर काही एटीएम कार्ड दुसऱयाच खात्याशी लिंक झाल्याचा प्रकार समोर आला. सुमारे 20 ते 25 खात्यांबाबत असा फेरफार झाल्याचे समजते. याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता गेल्या चार महिन्यांपासून असा प्रकार सुरू असल्यचे समजते. यामुळे जिल्हा बँकेचा कारभार पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. या प्रकारबाबत बँकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.