|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » रितू फोगटला रौप्यपदक

रितू फोगटला रौप्यपदक 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

पोलंडमध्ये झालेल्या 23 वर्षाखालील वयोगटाच्या वरिष्ठांच्या विश्व महिला कुस्ती स्पर्धेत भारताची महिला मल्ल रितू फोगटने 48 कि. वजन गटात रौप्यपदक पटकाविले.

गेल्या वर्षी राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱया 23 वर्षीय रितूला पोलंडमधील स्पर्धेत अंतिम लढतीत तुर्कीच्या दिमरेनकडून पराभव पत्करावा लागला. रितूने 48 कि. वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बल्गेरियाच्या सेलिसिकाचा 4-2 अशा गुणांनी तर त्यानंतर उपांत्य लढतीत चीनच्या झु चा 4-3 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. रितूने अलिकडेच इंदोरमध्ये झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. तसेच आशियाई चॅम्पियनशीप महिलांच्या कुस्ती स्पर्धेत  तिने गेल्या मे महिन्यात कास्यपदक मिळविले होते.