|Friday, February 28, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » Gionee ने एकत्र लॉन्‍च केले ६ शानदार स्‍मार्टफोन

Gionee ने एकत्र लॉन्‍च केले ६ शानदार स्‍मार्टफोन 

ऑनलाईन टीम  / नवी दिल्‍ली  :

चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी Gionee ने एकत्र ६ स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. Gionee कडून लॉन्च करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये Gionee M7 प्लस, Gionee F205 आणि Gionee M7 मिनी, Gionee S11, Gionee S11s, Gionee F6 यांचा समावेश आहे. 

Gionee M7 हा एक लग्झरी स्मार्टफोन आहे. हा फोनमध्ये २१ कॅरेट गोल्ड प्लेटेड मेटल आणि काल्फस्किन लेदर देण्यात आलंय. हा फोन सुद्धा इतर सगळ्या स्मार्टफोनप्रमाणे बॅजल-लॅस डिझाईनमध्ये आहे. या स्मार्टफोनमध्ये खास ड्युअल सिक्युरिटी एनक्रिप्शन चिप देण्यात आली आहे.

Gionee M7 प्लस मध्ये ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले देण्यात आलाय. यासोबतच स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर, ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरीची सुविधा आहे. मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते. तसेच यात 5000mAh बॅटरी आहे. तर हा कंपनीचा पहिला वायरलेस डिवाईस आहे

Related posts: