|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मतदार सर्व्हेक्षणात सोलापूर जिल्हा राज्यात दुसरा

मतदार सर्व्हेक्षणात सोलापूर जिल्हा राज्यात दुसरा 

प्रतिनिधी /सोलापूर :

भारत राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रथमच घरोघरी जावून मतदार सर्व्हेक्षण अभियान राबविले असून यामध्ये नवीन मतदारांची नोंदणी, नावात दुरूस्ती, नाव वगळणे अशा विविध प्रकारची कामे करण्यासाठी 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत होती. यामध्ये बरीच कामे राहिल्यामुळे मतदार सर्व्हेक्षण करण्याकरीता 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. जिह्याचे मतदार सर्व्हेक्षणाचा काम पाहता मतदार सर्व्हेक्षणात सोलापूर जिल्हा राज्यात दुसऱया क्रंमाकावर आल्याची माहिती, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ यांनी दै. तरूण भारत संवादशी बोलताना दिली.

  मतदार सर्व्हेक्षणात सोलापूर जिह्यातील पंढरपूर, माढा, करमाळा, बार्शी या तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र शहरातील मंगळवेढा, अक्कलकोट, उत्तर सोलापूर या तालुक्यात मतदार सर्व्हेक्षणसाठी प्रतिसाद कमी मिळत असल्याचे धुमाळ यांनी सांगितले. सोलापूर जिह्यात 32 लाख मतदारांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.

मतदार सर्व्हेक्षण करण्यासाठी प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका आदी मिळून 3 हजार 290 कर्मचारी काम करीत आहेत. पंढरपूर तालुक्यातील 18 हजार कुटूंबीयांची सर्व्हेक्षण पूर्ण झालेली आहे तर माढय़ातील 50 हजार कुटूंबाचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. तसेच करमाळा, बार्शी या तालुक्यातील मोठय़ा प्रमाणात सर्व्हेक्षण झालेली आहे.

15 ते 30 नोव्हेंबर आज अखेर जिह्यात झालेले मतदार सर्व्हेक्षण पुढीलप्रमाणे- सोलापूर जिह्यात आतापर्यंत एक लाख 80 हजार 959 कुटूंबीयांची मतदार नोंदणीसाठी घरोघरी जावून पडताळणी करण्यात आलेली आहे. यापैकी 18 हजार 151 कुटूंबीयांची नोंदणी झालेली आहे. फॉर्म नंबर 6 ए हा फॉर्म अद्याप भरलेला नाही. मतदार यादीतून 641 मतदार कुटूंबीयांची नावे वगळण्यात आलेली असून 3 हजार 433 मतदारांची नावात दुरूस्ती झालेली आहे. 273 कुटूंबीयांचे स्थालांतरीत फार्म भरण्यात आले आहे. मतदार सर्व्हेक्षण करण्यासाठी 22 हजार 498 पैकी एक हजार 196 कर्मचाऱयांनी मोबाईल ऍपचा   वापर केलेला आहे, असेही धुमाळ यांनी सांगितले.

Related posts: