|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ऑन लाईन सेक्स रॅकेटचा पर्दा फाश

ऑन लाईन सेक्स रॅकेटचा पर्दा फाश 

प्रतिनिधी /पणजी :

गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी ऑन लाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करुन दोन ठिकाणी कारवाई केल्या आहे. दोन्ही ठिकाणाहून चार संशयिताना अटक केली असून दोन युवतींची सुटका केली आहे. ऑन लाईन द्वारा हाय प्रोफाईल लोकांसी संपर्क करून त्यांना युवतींचा पुरवठा केला जात होता. असे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पहिली कारवाई शिवोली येथे करून दोन संशयिताना अटक केली होती त्यात डॅवीड, राहुल व अमीर यांचा समावेश आहे. तिघेही संशयित परप्रांतीय असून ते गोव्यात राहून ऑनलाईन वेश्या व्यावसाय चालवत होते. इतर राज्यातील युवतींना आणून त्यांना बळजबरीने वेश्या व्यावसाय करण्या भाग पाडत होते. संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांना अटक केली आहे. पीडित युवतींना मेरशी येथील अपनाघर मध्ये पाठवण्यात आले आहे. सीआडी निरीक्षक राहुल परब या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.