|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा 

ऑनलाईन टीम / गडचिरोली :

गडचिरोलीतील अहेरी भागात पोलिसांसाबत झालेल्या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केले.

अहेरी अहसीलच्या कल्लेड जंगलात आज पहाटे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहदरम्यान पोलिसांना मोठे यश आले आहे. मागील महिन्याभरात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शाहीद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र,गडचिरोली स्थानिक आणि छत्तीसगड पोलिस हे सतर्क होते.नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी बडे पोलिस अधिकारी मागील आठ दिवसांपासून जिह्यात तळ ठोकून होते. सात नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याने पोलिसांच्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे.