|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कारभाऱयांनो लय झाली आश्वासनं,सुरूवात करा विकाकामे.

कारभाऱयांनो लय झाली आश्वासनं,सुरूवात करा विकाकामे. 

हिराजी देशमुख कडेगांव

नुकत्याच कडेगाव तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होवून सरपंच व सदस्य निवडी झाल्या त्या पाठोपाठ आता गावच्या उपसरपंच्याही निवडी पुर्ण झाल्या आहेत.गावोगावचे हे मंत्रीमंडळ आता स्थिर झाले आहे.आता ग्रामपंचायत निवडणूकीच्यावेळी जनतेला तसेच गावाच्या विकासासाठी दिलेली आश्वासने,जाहिरनाम्यात दिलेली वचने पूर्ण करणे गरजेचे आहे.आता निवडणूक संपली,कारभाऱयांनो लय झाली आश्वासने,सुरू करा विकासाची कामे अशा जनतेच्या प्रतिक्रिया आहेत.

   कडेगाव तालुक्यातील दोन गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका हया तडजोडीने बिनविरोध होवून 41 गावच्या थेट सरपंच निवडी लागल्या होत्या.आणि ज्या ठिकाणी निवडणूका लागल्या त्या ठिकाणी काहि गावात हजारोंची तर काहि गावात लाखोंची उधळपटटी झाली.जेवणावळी तसेच रोखीत लाखो रूपयांचा चुराडा झाला.तेवढा पैसा गावच्या विकासाला  लागला तर गावात चांगल्या सुधारणा झाल्या असत्या असे बोलले जात असले तरी वागणार कोण हा खरा प्रश्न आहे.

 यंदा थेट सरपंच निवडणूक असल्यामुळे ग्रामपंचायतीला विशेष महत्व प्राप्त झालं.अशा बतावण्या सुरूवातीला ऐकायला मिळत होत्या.पण प्रत्यक्षात मात्र असं काहीच नव्हतं.ज्यांच्याकडे पैसा,असा फँक्टर सालाबादप्रमाणे यंदाही अनेक ग्रामपंचायतीत दिसून आला.नाय तर मग आमच्या आळीतल्या,आमच्या गल्लीतला.आमच्या बुडक्यातला,आमच्या भावकीला आजवर उमेदवार झाला नाही.असं म्हणत फुगून बसणारी मंडळी तालुका लेवलच्या पुढाऱयाच्या समझोत्यांन निवडणूकीत  उभी राहिली.

 गावचा नेता होण्यासाठी अनेक स्वयंघोषित नेते बोहल्यावर चढले होते.निवडणूकीत गावासाठी मी काय करणार हे सांगण्यापेक्षा विरोधकांनी किती उलाघाली केल्या हे जनेतला सांगणं म्हणजेच याची प्रचाराची पध्दती,गावच्या विकासाचे कोणालाही पडले नव्हते.निवडणूक कालावधीत गुप्त प्रचाराच्या निमित्ताने निवडणूक काळात रात्री जागून काढल्या जायच्या ते केवळ मतं फोडण्यासाठी,हया फोडाफोडीच्या राजकारणात हाल मात्र गावकऱयांचे व्हायचं,घरातील लक्ष्मी रात्रभर जेवणासाठी नवऱयाची वाट बघत रात जागून काढायची तर दुसरीकडे हे कारभारी मात्र कुणाऱया तरी रानात केंबडं बोकडाच्या मटणावर तुटून पडायचे,साग्रसंगीत जेवण असल्यावर तर गंमत वेगळीच ग्रामपंचायत इलेक्शन प्रचंड प्रमाणावर पैसा खर्च केला गेला आहे.

 खरं तर निवडणूकीमध्ये ज्यांना आजपर्यंत नेतृत्वाची संधी मिळाली नाही,त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून नेतृत्व करण्याची संधी मिळाली,गावचा कारभारी त्याच्यासाठी आरक्षण निघालं नाही तर थेट सरपंच पदाच्या निवडणूकीला स्वतःच्या बायकोला उभं करायचं ठरवून मोकळा होतो,पण हे त्या महिलेला फाँर्म भरायच्या टायमाला कळतं.तिची इच्छा नसतानाही केवळ राजकीय इर्षैसाटी व वर्चस्यासाठी तिला सरपंचपदाचे उमेदवार केलं जातं इतर आरक्षणाच्या बाबतीतही यावेळी निवडणूकीत आजवर चालत आलेल्या वर्चस्ववादाच्या परंपराच बघायला मिळाल्या त्यामुळे कटटर,एकनिष्ठ राहिलेल्यांच्या हातीयावर्षी काहि मिळाले नाही.

   दुसरीकडे काही गावात आजपर्यतच्या सत्ताधारी व विरोधक यांय्या जाचाला कंटाळून तरूणाई राजकारणात आली खरी पण त्यांना आर्थिक व राजकीय ताकत कमी पडली,हही यावेळी पंचवार्षिक निवडणूकीच्या निमित्ताने दिसून आले.त्यामुळे तालुका पातळीवरील नेत्यांचे कटटर समजल्या जाणाऱया कार्यकर्त्यांना यावेळी निवडणूकात आपल्या नेत्यानं कसं पध्दतशीरपणे बाजूला केलं.हेही आम्हाला कळून चुकलं आसल्याच्या भावना कार्यकर्त्यानी बोलून दाखविल्या आहेत.

 आश्वासनांची पुर्ती करा

   आता गावागावाचं इलेक्शन संपलं पण,या बरोबरच सिलेक्शनही संपले आहे.मात्र गावागावात पोटतिडकीने दिलेली आश्वासने पाळणे गरजेचे आहे.तीच ती आश्वसनं पुढच्या पंचवार्षिकला काँपी करून वापरू नका.अतिसंवेदनशिल गावाला परत हसतं खेळतं बनविण्यासाठी कारभाऱयांनी आता पुढं सरसावण्याची गरज आहे.तसेच गावच्या विकासकामांचा गाडा किंवा पूर्वीच्या सत्ताधाऱयांनी केलेल्या चुका सुधारून पुढे जाण्याची गरज आहे.असे केले तरच जनता तुम्हाला पुढच्या पंचवार्षिकला डोक्यावर घेईल.अन्यथा तुम्हालाही घरचा रस्ता दाखवण्यास कमी पडणार नाही.

  आता 43 गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या आहेत.42 गावात ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच विराजमान झाले आहेत.केवळ रेणुशेवाडी गावातील ग्रामपंचायतीत सरपंच पदाचे आरक्षण असून गावाती आरक्षणाची व्यक्ती नसल्याने सरपंचपद रिक्त आहे.काहि संख्याबळ भाजपाचे सरपंच काँग्रेसचा तर काहि गावा संख्याबळ काँग्रेसचे सरपंच भाजपाचे असे क्वचित काहि गावात घडले आहे.मात्र आता निवडणूका झाल्या आहेत त्यामुळे सर्वांनी गावच्या विकासासाठी कामाला लागणे गरजेचे आहे.जिल्हा भाजपा अध्यक्षपद व जिल्हा परीषदेचे अध्यक्षपद,पंचायत समिती सभापतीपद देशमुख कुटुंबियांच्याकडे आहे तर काँग्रेसकडे जिल्हा अध्यक्ष,दोन आमदार,एक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद कदम कुटुंबियांच्याकडे आहे.आता निवडणूका संपल्या आता गावच्या विकासाचे राजकारण करा आता आपण पक्षाचे नव्हे तर गावातील आम जनतेचे सरपंच,उपसरपंच,सदस्य आहात याची जाणीव ठेवून कामाला लागा तळयातील थोडे पाणी चाखा मात्र सगळी तळेच संपवू नका अशी जनतेची अपेक्षा आहे.

Related posts: