|Thursday, January 23, 2020
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » ‘टू व्हीलर्स’साठी ‘गुगल मॅप’दाखवणार शार्टकट रूट

‘टू व्हीलर्स’साठी ‘गुगल मॅप’दाखवणार शार्टकट रूट 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा सामना करणाऱया दुचाकी स्वारांसाठी एक महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी आहे.केवळ याच नव्हे तर, सर्वच दुचाकी स्वारांसाठी गुगल कामी येणार आहे.त्यासाठी गुगल एक मॅप ऍप लाँच करणार असून या ऍपद्वारे दुचाकीस्वाराने शार्टकट रूट शोधणे सोपे जाणार आहे.

रस्त्यावरून गाडी चालवताना वाहतूक कोंडीने आपण सर्वजण हैराण होतो.चारचाकी गाडय़ांची रस्त्यांवर रांगच रांग लागली असताना दुचाकीवाले मात्र,मिळणाऱया इवलूशा जागेतून पुढे पुढे जाताना दिसतात.अशा वेळी त्या दुचाकीस्वारांकडे काहीशी असूया आणि काहीसा राग अशा भावमुद्रेने पाहणारे गाडीतील चेहरे पाहणे मोठे मजेशीर असते.गुगलच्या नव्या टू- व्हीलर मॅप ऍपमुळे या चेरऱयांमध्ये आता वाढ होणार आहे.कारण मॅप ऍपमुळे दुचाकीस्वारांचे काम आणखी सोपे होणार असून त्यांना वाहतूक कोंडीतून सुटण्याचा आणखी एका सोपा आणि वेळ वाचवणारा मार्ग सापडणार आहे.

 

 

 

 

Related posts: