|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सर्वेश गावडे व विशांत नाईक विजयी

सर्वेश गावडे व विशांत नाईक विजयी 

प्रतिनिधी/ फोंडा

फोंडा तालुक्यातील कुंडई ग्रामपंचायतीच्या प्रभाग 1 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत सर्वेश गावडे तर मडकई पंचायतीच्या प्रभाग 2 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत विशांत मुकुंद नाईक हे उमेदवार विजयी झाले. फोंडा मामलेदार कार्यालयात काल सोमवारी सकाळी मतमोजणी झाली.

कुंडई पंचायतीच्या प्रभाग 1 मधून विजयी झालेल्या सर्वेश गावडे यांना 327 तर त्यांचे प्रतिस्पर्धी संदेश नाईक यांना 136 मते मिळाली. एकूण मतदान 471 एवढे झाले. या प्रभागातील पंचसदस्य विद्या कुंडईकर यांना सरकारी नोकरी मिळाल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही पोटनिवडणुक घ्यावी लागली.

मडकई पंचायतीच्या प्रभाग 2 मधून विजयी झालेल्या विशांत मुकुंद नाईक यांना 289 तर त्यांचे प्रतिस्पर्धी उदय रोहिदास नाईक यांना 118 मते मिळाली. एकूण मतदार 413 झाले. या प्रभागातील पंचसदस्य सुरेश नाईक हे सरकारी नोकरीत रुजू झाल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही पोटनिवडणूक घ्यावी लागली.

 

Related posts: