|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Top News » अमरनाथ मंदिरात मंत्रपठण आणि घंटा वाजवण्यावर बंदी

अमरनाथ मंदिरात मंत्रपठण आणि घंटा वाजवण्यावर बंदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अमरनाथ मंदिरात मंत्रपठण आणि घंटा वाजवण्यावर हरित लवादाने बंदी घातली आहे. हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती स्वतंत्र कुमार यांनी बुधवारी हे आदेश दिले.

या मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांना त्यांच्याकडील वस्तू आणि मोबाईल बाहेर ठेवावे लागतील, यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचे आदेशही लवादाने दिले आहेत. तसेच मंदिराच्या गुहेत प्रवेश केल्यानंतर भाविकांनी ‘मंत्रजप’ किंवा ‘जयजयकार’ करू नये, असेही लवादाने म्हटले आहे. या आदेशाची त्वरित आणि सक्त अंमलबजावणी व्हावी. याशिवाय, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच्या शेवटच्या चौकीपासून ते गुहेपर्यंत भाविकांनी एकेरी रांगेतच जावे, असेही लवादाने सांगितले आहे.

मागील महिन्यात यात्रेकरूंना आवश्यक सुविधा न पुरवल्याच्या कारणावरून हरित लवादाने मंदिर प्रशासनाची कार्यकारिणी बरखास्त केली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाला यासंबंधीचा स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यानंतर लवादाने आज मंत्रपठणास आणि घंटा वाजवण्यावर बंदी घातली आहे.

Related posts: