|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » जनतेमुळे नव्हे तर ईव्हीएममुळे भाजपला बहुमत : निरुपम

जनतेमुळे नव्हे तर ईव्हीएममुळे भाजपला बहुमत : निरुपम 

ऑनलाईन टीम / मुंबई :

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत जरी भाजपला बहुमत निश्चित झाले असले तरी देखील हे यश भाजपला जनतेमुळे नव्हे तर इव्हीएममुळे मिळाले असल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

तसेच ईव्हीएम फेरफार विषयी आगोदरच शंका होती. आयटी तज्ञांना हाताशी धरुन हे फेरफार केले जातात, असेही ते म्हणाले. गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये भाजपने बहुमत मिळवले आहे. गुजरातमध्ये भाजप 182 पैकी 103 जागांवर आघाडीवर तर हिमाचल प्रदेशमध्ये 69 पैकी 43 जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्यावरुन निरुपम यांनी हा आरोप केला.

Related posts: