|Saturday, February 29, 2020
You are here: Home » क्रिडा » विंडीज-न्यूझीलंड आज पहिली वनडे

विंडीज-न्यूझीलंड आज पहिली वनडे 

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन

न्यूझ्^ााrलंडच्या भूमीत कसोटी मालिका एकतर्फी गमविल्यानंतर आता विंडीजचा संघ बुधवारपासून येथे सुरू होणाऱया वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. स्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या कामगिरीवरच विंडीजचे यश अवलंबून राहील.

न्यूझीलंडने अलिकडेच विंडीजविरूध्द कसोटी मालिका 2-0 अशी एकतर्फी जिंकली असून आता विलियमसनचा न्यूझीलंड संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत आपली विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. विंडीजचा सलामीचा फलंदाज ख्रिस गेल याची फलंदाजी बहरल्याचे जाणवते. बांगलादेश प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेत गेलने 69 चेंडूत 18 विक्रमी षटकारासह 146 धावा झोडपल्या. गेलच्या कामगिरीमुळे बांगलादेश प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात गेलच्या संघाला विजेतेपद पटकाविता आले. गेलचे न्यूझीलंडमध्ये या मालिकेसाठी आगमन झाले आहे.

न्यूझीलंडची गोलंदाजी भक्कम असून टीम साऊदी आणि बोल्ट हे नवा चेंडू हाताळतील.मात्र गेल समोर न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीची सत्व परीक्षा ठरू शकेल. न्यूझीलंडचे गोलंदाज विंडीजची सलामीची जोडी लवकर बाद करण्यासाठी खास डावपेच आखतील. आयसीसीच्या वनडे सांघिक मानांकनात विंडीज सध्या नवव्या स्थानावर आहे. बुधवारच्या पहिल्या सामन्यात सॅम्युअल्स आणि सुनील अँब्रीस दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत.  तसेच पाठदुखीमुळे गोलंदाज जोसेफ या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. आयसीसीच्या वनडे सांघिक मानांकनात न्यूझीलंडचा संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे. बुधवारच्या सामन्यात न्यूझीलंड संघाला ग्युप्टील आणि ग्रॅन्डहोम यांची उणीव भासेल.

न्यूझीलंडचे हे दोन्ही खेळाडू जखमी आहेत. या मालिकेतील बुधवारच्या पहिल्या सामन्यानंतर न्यूझीलंड संघ व्यवस्थापन कर्णधार विल्यम्सन आणि साऊदी याना विश्रांती देणार आहे. घरच्या मैदानावर नजीकच्या कालावधीत पाक, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरूध्दचे सामने न्यूझीलंडला खेळावे लागणार असल्याने त्यांच्या संघ व्यवस्थापनाने कर्णधार विलियमसन आणि साऊदी यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरेल.

Related posts: