|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » अशोक चव्हाणांना दिलासा ; राज्यपालांनी दिलेली चौकशीची परवानगी रद्द

अशोक चव्हाणांना दिलासा ; राज्यपालांनी दिलेली चौकशीची परवानगी रद्द 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आदर्श घोटाळय़ाप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे.आदर्श घोटाळय़ाप्रकरणी राज्यपालांनी दिलेली अशोक चव्हाण यांच्या चौकशीची परवानगी मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे.

आदर्श सोसायटीमध्ये अशोक चव्हाण यांच्या तीन नातेवाईकांना सदनिका देण्यात आल्याचे समोर आल्यानंतर नोव्हेंबर 2010मध्ये अशोक चव्हाण यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते.तत्कालीन काँग्रेस सरकारला यावरून मोठी नामुष्की सहन करावी लागली होती.कालच सीबीआयच्या विशेष न्यायालयाने टू जी घोटाळाप्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.त्यापाठोपाठ आज आदर्श घोटाळय़ात अशोक चव्हाण यांनाही दिलासा दिला आहे.