|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महापौरपदी स्वाती यवलुजे

महापौरपदी स्वाती यवलुजे 

प्रतिनिधी/कोल्हापूर :

 कोल्हापूर महापालिकेच्या 45 व्या महापौरपदी स्वाती यवलुजे तर 42 व्या उपमहापौरपदी सुनील पाटील यांची शुक्रवारी निवड झाली. दोन्ही निवडी हात वर करून मतदानाने झाल्या. पिठासन अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमणार अध्यक्षस्थानी होते. यवलूजे कसबा बावडय़ातील पोलीस लाईन प्रभाग क्रमांक 6 च्या नगरसेविका आहेत. तर पाटील रामानंदनगर-जरगनगर प्रभाग क्रमांक 67 चे नगरसेवक आहेत. निवडीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी महापालिकेसमोर तसेच प्रभागात फटक्यांची अताषबाजी व गुलालांची उधळन करून जल्लोष केला.

महापौर, उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणूकीत स्वाती यवलूजे, सुनील पाटील यांना 48 मते तर विरोधातील भाजप-ताराराणी आघाडीचे महापौरपदाचे उमेदवार मनिषा कुंभार व उपमहापौरपदाचे उमेदवार कमलाकर भोपळे यांना 33 मते मिळाली. शिवसेनेच्या 4 सदस्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेंदवारांना मतदान केले. दरम्यान, माजी महापौर हसीना फरास यांची तब्येत बिघडल्याने सभागृहात डॉक्टरांना बोलावून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. मतदाना दरम्यान, शिवसेनेच्या सदस्यांमध्ये चुळबुळ सुरु होती. त्यांची गटनेते शारंगधर देशमुख, ज्येष्ठ नगरसेवक जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली. यानंतर सर्वांनी हात वर केल्यानंतर दोन मिनंटानी शिवसेनेच्या चारही सदस्यांनी हात वर करून यवलूजे यांना मतदान केले. यामुळे महापालिकेत उलट सुलट चर्चा सुरु आहे.

     केबल ऑपरेटर ते उपमहापौर

 राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील पाटील यांची मनपामध्ये शांत, संयमी व मनमिळावू नगरसेवक म्हणून ओळख आहे. रामानंदनगर व जरगनगर येथे त्यांचा केबल व्यवसाय आहे.  केबल ऑपरेटर ते उपमहापौर असा त्याचा प्रवास आहे. प्रभागात त्यांच्याकडून विकासकामेही चांगली झाली आहेत.

Related posts: