|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नविन वर्षापासून सर्व कामगारांना सातवा वेतन लागू करावा : ख्रिस्तोफर फोन्सेला

नविन वर्षापासून सर्व कामगारांना सातवा वेतन लागू करावा : ख्रिस्तोफर फोन्सेला 

पणजी :

नविन वर्षापासून राज्यातील सर्व कामगारांना सातवा वेतन लागू केला पाहिजे. आपल्या कुटुंबियांना खुष ठेवण्यासाठी राज्यातील सर्व कामगारांना रु 1<8000 व अधिक पगार असणे गरजेचे आहे. आज प्रत्येक वस्तू महाग होत चालल्या आहे. सद्याच्या काळात कमीत कमी अठरा हजार पगार असणे गरजेचे आहे. आपल्या राज्यात कमी पगार असल्यामुळे आज राज्यातील प्रत्येक युवक विदेशात जाऊन काम करतात. तेव्हा सरकारने यावार बारकाईने लक्ष घालून गोमंतकीय कामगारावर अन्याय होत असलेला बंद होणे गरजेचे आहे असे अखील भारतिय ट्रेड युनियन काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ख्रिस्टोफर फोन्सेला यांनी पणजी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी पत्रकार परिषदेत अखील भारतिय ट्रेड युनियन काँग्रेस कमिटीचे सचिव सुहास नाईक व अखील भारतिय ट्रेड युनियन काँग्रेस कमिटीचे उपसरचिटणीस राजू मंगेशकर उपस्थित होते.

  आपल्या राज्यात बिगर गोमंतकीय येऊन काम करताना दिसतात हे अत्यंत धोक्याचे चित्र असून बिगर गोमंतकीयामुळे अनेक वाईट प्रसंग सुद्धा आपल्या राज्यात घडतात. तसेच आपल्या राज्यातील युवकांनी विदेशात जाऊन नेकरी करण्याचे बंद होणे गरजेचे आहे. गोंय, गोंयकार व गोंयकारपण हे फक्त स्वताच्या फायद्यासाठी या नाऱयाचा उपयोग करत असल्याचे दिसून येत आहे. जर त्यांना गोंयकारावर ऐवढाच प्रेम वाटत असला तर त्यांनी आज अशा गोष्टीवर लक्ष घालून आपल्या गोंयकारांना न्याय दिला असता. तसेच राज्यातील मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अधिवेशनात नुकतीच भाषणे न करता कामगारांना भेटून त्यांच्या समस्या ऐकून घेणे गरजेचे आहे.

आज देशात अनेक पत्रकारावर अन्याय होत असतो पत्रकार दुसऱयावर होणाऱया अन्याविरुद्ध लढतात मात्र त्यांच्यावर होत असलेल्या अन्यावर लढा देण्यासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही. देशात आज पर्यंत अनेक पत्रकारांचा खुन करण्यात आला तेव्हा यशा गोष्टीवर सुद्धा सरकारने लक्ष घालणे गरजेचे आहे. कामगारावर तसेच पत्रकारावर  होत असलेल्या अन्यायावर लढा देण्यासाठी अखील भारतिय ट्रेड युनियन काँग्रेस कमिटी सदैव पुढे असेल असे फोन्सेला यांनी पुढे बोलताना सांगितले.

Related posts: