|Friday, December 6, 2019
You are here: Home » Top News » सलग सुट्टय़ांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी

सलग सुट्टय़ांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

सलग सुट्टयांमुळे बाहेर फिरायला जाणाऱयांना शनिवारी सकाळपासूनच अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आहे.मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूकीचा खोळंबा पहायला मिळत आहे.

कळवा ते विटावा मार्ग बंद असल्याने नवी मुंबईहून ठाण्याला जाणाऱया वाहनांना ऐरोली- मुलुंडमार्गे ठाणे गाठावे लागत असल्याने तिथे वाहतूक कोंडी झाली आहे. तर मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ पुण्याच्या दिशेने मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

25 डिसेंबरपर्यंत ’नो एण्ट्री’ करण्यात आली आहे. याचदरम्यान वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेने केले आहे. यामुळे नवी मुंबईकडून बेलापूर रोडने आणि ऐरोली पटणी कंपनी मार्गे विटावा-कळवा- ठाण्याचे दिशेने येणाऱया सर्व प्रकारच्या वाहनास पटणी कंपनीकडून बेलापूर रोडला मिळणा-या ठिकाणी प्रवेश बंद केला आहे.

 

 

 

Related posts: