|Saturday, October 19, 2019
You are here: Home » क्रिडा » वॉरियर्सकडून स्मॅशर्सला धक्का

वॉरियर्सकडून स्मॅशर्सला धक्का 

वृत्तसंस्था /गौहत्ती :

शनिवारपासून येथे सुरू झालेल्या प्रिमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत अवाधे वॉरियर्सने विद्यमान विजेत्या चेन्नई स्मॅशर्सला सलामीच्या लढतीत पराभवाचा धक्का दिला. अवाधे वॉरियर्सने स्मॅशर्सवर 3-0 अशी आघाडी तसेच (4-0 गुणांनी) बढत घेतली आहे. ही लढत पाच सामन्यांची आयोजित केली आहे.

अवाधे वॉरियर्सने या लढतीत आपले पुरूष एकेरीचे दोन्ही सामने व त्यानंतर मिश्रदुहेरीचा सामना जिंकून विजयी आघाडी मिळविली आहे. अवाधे वॉरियर्सच्या के. श्रीकांतने स्मॅशर्सच्या फ्रान्सच्या लिव्हेरडेझचा 15-12, 15-14 असा पराभव केला. त्यानंतर काश्यपने स्मॅशर्सच्या फरिदचा 15-12, 15-8 असा पराभव केला. मिश्र दुहेरीच्या सामन्यात अवाधे वॉरियर्सच्या ख्रिस्टीना आणि तेंग यांनी स्मॅशर्सच्या ख्रिस आणि गॅब्रेली ऍडकॉकवर 10-15, 15-5, 15-12 अशी मात केली. वॉरियर्स संघातील सायना नेहवालला दुखापतीमुळे खेळता आले नाही.