|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » शेर-ओ- शायरीच्या बादशाहला गुगलची मानवंदना

शेर-ओ- शायरीच्या बादशाहला गुगलची मानवंदना 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शेर ओ शायरीचा बादशाह अर्थात मिर्जा गालीब यांना गुगलने डूडलच्या माध्यमातून मानवदंना दिली आहे. मिर्जा गालीब यांची आज 220वी जयंती आहे. त्यानिमित्त गूगलनेखास डूडल तयार करून मिर्जा गालिब यांना अदरांजली वाहिली आहे.

मुघलकालीन भिंती,त्यावरील आकर्षक रचना,सूर्य आणि पिवळसर प्रकाश अशा पार्श्वभूमीवर मिर्जा गालीब यांचे पूर्ण चित्र असे अत्यंत मनमोहक या डूडलचे स्वरूप आहे.अत्यंत हालाखीच्या स्थितीत मिर्जा गालिब यांचं बालपण गेलं. संपूर्ण आयुष्य एका संघर्षाच्या उन्हातच त्यांनी घालवले. आर्थिक संकटांनी तर त्यांना बेजार केले मात्र जगण्यातले चटकेही त्यांनी शब्दबद्ध केले. शायरीतून व्यक्त केले.

लहान असतानाच गालिब यांचे पितृछत्र हरपले. त्यानंतर त्यांची काकांनी त्यांना सांभाळले. मात्र त्यांचा आधारही त्यांना फार काळ मिळाला नाही. वयाच्या 13 व्या वषी उमराव बेगम यांच्या विवाह झाला आणि ते दिल्लीत आले. त्यानंतरचं संपूर्ण आयुष्य दिल्लीतच गेलं. मुघल काळातील शेवटचा सत्ताधारी बहादुर शाह जफर याच्या दरबारात कवी म्हणूनही ते राहिले.