|Sunday, November 17, 2019
You are here: Home » उद्योग » गोदरेज लॉक्सचे डिझाईनप्रणित नावीन्याचे धोरण

गोदरेज लॉक्सचे डिझाईनप्रणित नावीन्याचे धोरण 

पुणे / प्रतिनिधी :

गोदरेज लॉकिंग सोल्यूशन्स अँड सिस्टीम्स (गोदरेज लॉक्स) या 120 वर्षांपासून कार्यरत असलेल्या लॉकिंग सिस्टीम्स व हार्डवेअर सोल्यूशन उत्पादकाने व गोदरेज समूहाचा भाग असलेल्या कंपनीने नवी उत्पादने आणणे, देशांतर्गत बाजारातील विस्तारामध्ये वाढ करणे व नव्या आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश करणे याबरोबरच व्यवसायाच्या वाढीबद्दलच्या धोरणांमध्ये डिझाइन-प्रणित नावीन्याचा समावेश असेल, असे जाहीर केले आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये व्यवसायाच्या 1000 कोटी रुपये उत्पन्नाचा टप्पा पार करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

डिझाइनप्रणित नावीन्याबद्दल बोलताना गोदरेज लॉकिंग सोल्यूशन्स अँड सिस्टीम्सचे कार्यकारी उपाध्यक्ष व बिझनेस हेड श्याम मोटवानी म्हणाले, जगभरातील ग्राहक डिझाइनच्या बाबतीत चोखंदळ होऊ लागले आहेत. त्यांना त्यांच्या घरासाठी चांगले डिझाइन हवे आहे व डिझाइन व कार्यपद्धती या दोहोंचा मेळ संपूर्ण घरामध्ये घालायचा आहे. डिझाइनविषयी विचार व तंत्रज्ञान कौशल्यामुळे लॉकिंग सोल्यूशन केवळ उपयोगाची उत्पादने न उरता तंत्रज्ञान व सुरक्षितता-प्रणित उत्पादने बनली आहेत. त्यामुळे, डिझाइन-प्रणित नावीन्य व ग्राहककेंद्रितता यावर आमचा अधिक भर असणार आहे. विविध श्रेणींतर्गत अनेक नवी उत्पादने दाखल करण्याचे आमचे नियोजन असून, त्या उत्पादनांमध्ये सौंदर्य व कामगिरी यांची सांगड घातली जाईल.

रुर्बन (ग्रामीण व शहरी) उपक्रमांतर्गत, लॉक्सने ग्रामीण व शहरी बाजारांसाठी (अंदाजे 100,000 वा त्याहून कमी लोकसंख्या) विशिष्ट उत्पादने तयार करायचे ठरविण्यात आले असून, या परिसराच्या गरजा पूर्ण करतील, अशी योग्य उत्पादने सादर करून त्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य व माहिती कंपनीकडे आहे, असा कंपनीचा विश्वास आहे.

Related posts: