|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पाच हजारची लाच घेताना तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

पाच हजारची लाच घेताना तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात 

वार्ताहर /शिराळा :

येथील तलाठी सुभाष श्रीपती पाटील (वय 51. रा. इस्लामपूर. मुळ गाव ऐतवडे खुर्द. ता वाळवा) याने खरेदी जमिनीची नोंद करणे आठी पाच हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत खात्याने तलाठी कार्यालय शिराळा येथे दुपारी चार वाजता रंगेहात पकडले.

या बाबत माहिती अशी की, पावलेवाडी येथील सुजित जयसिंग देसाई सर्वे नं 65/3 मधील 1.75 गुंठे ही त्यांच्या भावाने खरेदी केली होती. या जमिनीची नोंद करण्यासाठी 27 डिसेंबरला तलाठी सुभाष पाटील यांची भेट तक्रारदारांनी घेतली. यावेळी तक्रारदार विकास जयसिंग देसाई यांचीही नोंद घालण्यासाठी सहा हजाराची मागणी तलाठी यांनी मागणी केली.

तक्रारदार यांनी लाचलुचपत खात्याकडे याबाबत तक्रार दिली. त्यानुसार कोल्हापूर येथील लाचलुचपत खातेनिहाय सापळा रचून लाच घेताना रंगेहात पकडले. सदरची कारवाई कोल्हापूर येथील पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार श्यामसुंदर बुचडे, पोलीस नाईक शरद पोरे, संदीप पावलेकर, आबासाहेब गुंडणके, सर्जेराव पाटील यांनी केली. या बाबत रितसर गुन्हा दाखल केला असून तलाठी पाटील यास अटक केली आहे.

 

Related posts: