|Saturday, February 22, 2020
You are here: Home » leadingnews » कमला मिल कंपाऊंडमध्ये भीषण आग ; 14 जणांचा मृत्यू

कमला मिल कंपाऊंडमध्ये भीषण आग ; 14 जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमधील एका इमारतीच्या तिसऱया मजल्यावर गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 11 महिलांचा समावेश आहे.

हॉटेल मोजो बिस्त्राs रेस्टॉरंट ऍण्ड पबला गुरुवारी रात्री 12.30च्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी इथे मोठय़ प्रमाणात लोक उपस्थित होते. काही कळायच्या आतच आगीने रौद्ररुप धारण केले आणि काही क्षणात होत्याच नव्हतं झाले.

आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेल्sढ नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

 

 

Related posts: